Friday, September 21, 2012

श्री मोहटादेवी देवीचा यात्रा उत्सवाची गडावर जोरदार तयारी चालू आहे.

Sunday, October 2, 2011

शारदिय नवरात्र उत्सव सन २०१1
शारदिय नवरात्र उत्सव सन २०१1 दि. 28-09-2011, ते 11-10-2011 पर्यंत साजरा होत आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम
दिनांक २८-०९-२०११ रोजी आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून
श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.
विद्यालयातील मुला मुलीनी लेझीम , दांड्या , कला नुत्याचा कार्यक्रम होत असतो.
दिनांक २९-९-२०११ ते ५-१०-२०११ पर्यंत महाराष्ट्रतील नामवंत किरात्नाकाराचे कीर्तन होतात. ( नित्य अखंड हरीनाम सप्ताह )
आश्विन शु. दिनाक ४-१०-२०११ होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती.
दिनांक ६-१०-२०११ रोजी ---- विजयादशमी
दररोज काकड आरती भजन रात्रौ 9 ते 11 हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी.
विजयादशमी – सिमोलंघन शमीपुजजन
दिनांक ५-१०-२०११ रोजी - श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर, काशी आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी)
दिनांक ७-१०-२०११ रोजी एकादशी –प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ 8 ते प. 3
दिनांक ८-१०-२०११ आश्विन 12 नामांकित मल्लांचा जंगी हंगामा.बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा.
व दिनांक ११-१०-२०११ रोजी ( प्रोणिमा ) रात्री ९.०० वा. कीर्तन होऊन यात्रेची सागता होते.

Friday, November 12, 2010

‘जगदंबा आली दारी, नका पाठवू माघारी’

नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून मोहटा देवस्थानने राबविलेल्या स्त्री भ्रूणहत्या विरोधातील ‘जगदंबा आली दारी, नका पाठवू माघारी’ या उपक्रमाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.
मुलगाच हवा हा अट्टाहास, समाजात मुलींना मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक, दिवसेंदिवस हुंडाबळी प्रकरणात होणारी वाढ यामुळे मुलींचा जन्मदर घटत चालला आहे. राज्यात १९९१ साली १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४६ होते. ते २००१मध्ये ९१३वर आले. नगर जिल्ह्य़ात हेच प्रमाण सन २००१मध्ये ८८४ होते. ते आज घटत जाऊन ८५२वर आले आहे. सरकार, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते या समस्येवर आवाज उठवित असले, तरी याचे गांभीर्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही. या समस्येची जाणीव भाविकांना, विशेषत: महिलांना व्हावी या हेतूने देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी पुढाकार घेऊन ‘जगदंबा आली दारी, नका पाठवू माघारी’ ही संकल्पना मांडली. त्याला देवस्थान विश्वस्त शिवाजी फुंदे, श्रीधर गिरी, अर्जुन दहिफळे व इतर विश्वस्तांनी संमती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा सामान्य रुग्णालय व देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सध्या गडावर राबविला जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नवरात्राच्या पहिल्या माळेपासून पोलीस, न्यायाधीश, डॉक्टर, वकील, राजकारण, समाजकारण, परिचारिका, शिक्षण या क्षेत्रातील पाच नामवंत महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. याशिवाय देवस्थान समितीने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी लाखो माहिती पुस्तिका छापल्या असून, त्याचे भाविकांना दररोज वाटप केले जाते. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येचे कसे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात, होणारी शिक्षा याची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत देवस्थान समितीने दर्शनबारी रांगेत या विषयावरील मोठे कटआऊटस् लावले असून, त्यावर ‘तोरण बांधा रे, उघडा दारे, पसरा पायघडय़ा, टाका फुलं, नकोत नुसतीच मुलं’, ‘स्त्रीचा जन्म स्त्रीच्याच गर्भात, मग येऊ द्या ना तिला या जगात’ अशा घोषवाक्यांचा चांगला परिणाम झाला आहे. याशिवाय नगर जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांची स्त्री जन्मदराबाबतची सन २००१ ते २००९पर्यंतची तुलनात्मक आकडेवारी दिली आहे. जिल्ह्य़ात २००९च्या गणनेनुसार सर्वाधिक प्रमाण अकोले (९५१) येथे आहे. तर व्हिजन-२०२०ची अंमलबजावणी करणाऱ्या पालकमंत्री पाचपुते यांच्या श्रीगोंद्यात हे प्रमाण फक्त ८२२ आहे.
देवीच्या दर्शनास लाखो भाविक येतात. त्यांना या समस्येची जाणीव झाली, तर राज्यभर जागृती होईल. या हेतूने सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेने आम्ही हे अभियान राबविले. जिल्हा पोलीसप्रमुख कृष्णप्रकाश यांच्या हस्ते उद्घाटन झाले. देवस्थान समितीचे अध्यक्ष, तसेच सर्व विश्वस्तांनी पाठिंबा दिल्याने पदाच्या माध्यमातून एक प्रकारे देवीची सेवा करत असल्याचे समाधान मिळत आहे.

Sunday, September 5, 2010

शारदिय नवरात्र उत्सव

शारदिय नवरात्र उत्सव

दि. ०८ -१०- २०१०, ते २२-१०-२०१० पर्यंत साजरा होत आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून
श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.

आश्विन शु. 9 होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती.
आश्विन शु. प्रतिपदा ते महानवमी पर्यंत नित्य अखंड हरीनाम सप्ताह,
काकडआरती भजन रात्रौ 9 ते 11 हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी.
विजयादशमी – श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी) सिमोलंघन शमीपुजजन
एकादशी –प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ 8 ते प. 3
आश्विन 12 नामांकित मल्लांचा जंगी हंगामा.बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा.



Monday, July 12, 2010


पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता

श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.

श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।।

वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.

तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

देणगीचे स्वरुप व विनियोग

भाविक भक्त श्री मोहटादेवीस नवस बोलतात व महाद्वारी येऊन नवस पुर्ण करतात. त्यावेळी दक्षिणा दान पेटीमध्ये रक्कमेच्या स्वरुपात भक्त दान करतात. देवीस चांदीचे, सोन्याचे अलंकार अर्पण करतात ते दान पेटीमध्ये अर्पण करतात. देणगी कार्यालयामध्ये रोख रकमेच्या स्वरुपात भावीक देणगीदेतात तसेच धान्य, बकरी, कोंबड्या आदी ते स्वरुपात दान देतात. देवीची महापूजा अभिषेक पुजा, श्री सप्तशतीपाठी वाजन, कुंकुम अर्चन श्री सत्यनारायण पूजन आदि धार्मिक विधी साठी भाविक देणगी देतात. व विधी करतात. अशा मार्गाने देणगी जमा होते. व यामधून मंदीराचे भावीकांच्या सोयींसाठी बांधकामे, मंदीर इमारतीचे संगोपन, कर्मचारी वर्गाचे पगार, भावींकांच्या सोयीसाठीचे प्रकल्प, विद्युत, पाणी, आरोग्य, धार्मिक उत्सव इ. बाबींचा खर्च केला जातो


व्यवस्थापन

श्री क्षेत्र मोहटादेवीगडाची जशी जशी प्रसिद्धी होऊ लागली तशी-तशी भावीकांची संख्याही वाढली देणगीही भरपूर जमा होऊ लागली पर्यायी कामेही वाढली. देणगी स्विकारणे, योग्य विनियोग करणे, हिशोब ठेवणे, दानपेटी उघडणे, दान वस्तु सांभाळणे, संस्थानची विकास कामे करणे आदी जदबाबदारया वाढू लागल्या कामाचे व्यवस्थापनामध्ये अडचणी प्राप्त होऊ लागल्या व श्री मोहटादेवीच्याच इच्छेने देवस्थानची सरकारी कार्यालयामध्ये सन 1976 साली नोंद झाली व पुणे सन 1982 साली विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाली. देवस्थानचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश साहेब, अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब, सदस्य न्यायाधिश साहेब पाथर्डी, तहसिलदार साहेब पाथर्डी, वनअधिकारी साहेब नगर, गटविकास अधिकारी पाथर्डी, नगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील नामवंत नागरीक 5 व मोहटा गावांतील कार्यकुशल प्रतिष्ठीत नागरीक 5 असे 15 व्यक्तींचे व्यवस्थापन मंडळाची नियुक्त करण्यात आली. घटना तयार करण्यात आली. त्यानुसार मंडळाचे मार्गदर्शक तत्व प्रणालीनुसार मुख्यकार्यकारी अधिकारी कार्य़भार सांभाळतात. श्रद्धावान, कार्यकुशल तत्पर व सेवाभावी वृत्तीने, हिशोबनीस, कारकुन, विद्युत, पाणी व्यवस्था भाविकांची सेवा आदि कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आले. शास्त्रोक्त विधीवत पुजाअर्चा होम हवनादि धार्मिक कार्यासाठी विद्वान ब्रम्हवृंदाची नियुक्ती झाली व व्यवस्थापन व्यवस्थित सुरु झाले.


धार्मिक उत्सव

मासीक उत्सव -
दर पौर्णिमेस महाभिषेक पुजा, रात्री, 8 ते 9 अन्नदान
9 ते 11 किर्तन, 11 ते पहाटे 4 हरीजागर.

वार्षिक उत्सव –
चैत्र शु. प्रतिपदा ते रामनवमी – वा नवरात्रोत्सव श्रीराम जन्मोत्सव.
श्रावण वद्य 8 श्री कृष्ण जन्मोत्सव
भाद्रपद 4 ते 40 श्री गणेशोत्सव
आश्विन शु. 1 ते 9 शारदीय नवरात्रोत्सव
आश्विन शु. 11 प्रगट दिन आनंदोत्सव
कार्तिक शु. 1 मोहटागावामध्ये चांदीच्या मुखवटा पुजन दर्शन सोहळा.
7) मार्गशिर्ष शु. 15 दत्तजन्मोत्सव
8) पौष शु. 7 ते 15 शाकंभरी नवरात्रोत्सव
9) माघ वद्य 30 महाशिवरात्र
10) फाल्गुन शु. 15 होळी पुजन
11) चैत्र शु. 15 श्री हनुमान जन्मोत्सव

शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.

आश्विन शु. 9 होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती
आश्विन शु. प्रतिपदा ते महानवमी पर्यंत नित्य अखंड हरीनाम सप्ताह, काकडआरती भजन रात्रौ 9 ते 11 हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी.
विजयादशमी – श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी) सिमोलंघन शमीपुजजन
एकादशी –
प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ 8 ते प. 3 आश्विन 12 नामांकित मल्लांचा चंगी हंगामा.
बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा.